---Advertisement---
अहमदाबाद : समाज माध्यमांचा वापर करीत कट्टरपंथी घडवून देशविरोधी कारवाया करण्यासाठी चिथावणी देणे आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाखाली गुजरात दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसने दोन जणांना अटक केली.
आरोपींना ‘गझवा-ए-हिंद’ प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने एक दहशतवादी जाळे उभारण्याची, आरडीएक्स स्फोटकांचा वापर करून देशाविरुद्ध युद्ध छेडण्याचा, रा. स्व. संघाशी संबंधित लोकांना लक्ष्य करण्याचा आणि आपले हेतू साध्य करण्यासाठी समाज माध्यमांद्वारे तरुणांची भरती करण्याचा कट रचला होता, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
तांत्रिक आणि मानवी गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून समाजमाध्यमे व इंटरनेटवरील राष्ट्रविरोधी हालचालींवर एटीएस बारकाईने पाळत ठेवून आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रक्रियेदरम्यान पाटण जिल्ह्यातील सिद्धपूरचा रहिवासी असेल्या आणि कथितरीत्या कट्टरपंथी इस्लामी विचारसरणीने प्रभावित झालेल्या इरफान कालेखान पठाण यांच्याबाबत विशिष्ट माहिती प्राप्त झाली होती.
या गोपनीय माहितीच्या आधारे एटीएसने पठाणला चौकशीसाठी बोलावले. त्याच्या फोनची तपासणी केली असता, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमांचा वापर करीत तो इसिसशी संबंधित कट्टरवादी लोकांच्या आणि संघटनांच्या
दुसरा आरोपी मुंबईचा
पुढील तापसात या प्रकरणात मुंबईतील साकिनाका परिसरातील मुर्शिद झाहीद अख्तर शेख नावाचा तरुणही गुंतला असल्याचे निष्पन्न झाले. गुजरात एटीएसने महाराष्ट्र पोलिसांची मदत घेत त्याला ताब्यात घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शेखच्या मोबाईलमधूनही आक्षेपार्ह मजकूर सापडला आहे.








