---Advertisement---
भुसावळ : गुन्हेगारीमुळे राज्यात बदनाम असलेल्या भुसावळात पुन्हा खाकीवर हात उचलण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फायटरने केलेल्या हल्ल्यात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जिजाबराव पाटील जखमी झाले आहेत. याप्रकरणी संशयिताविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पसार झाला आहे.
दरम्यान, शहरात चोर्या घरफोड्या वाढल्या असतानाच आता गुन्हेगारांची दिवसेंदिवस हिंमतही वाढू लागली आहे. जेथे पोलीसही सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्य जनतेचे काय, असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.
शहरातील वसंत टॉकीजजवळील महाराणा प्रताप चौकात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार जिजाबराव पाटील हे सोमवार, 21 रोजी दुचाकी (एमएच-19-डीआर-5675) ने जात असताना दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास संशयित सोनू पांडे (पूर्ण नाव माहीत नाही, भुसावळ) हा दुचाकीसमोर अचानक आल्याने पाटील यांनी दुचाकी थांबवली व संशयिताला रस्त्याने जाताना पाहून चाल, असे सांगितले. याचे वाईट वाटल्याने पांडे याने आपल्याजवळील फायटरने जिजाबराव पाटील यांच्यावर हल्ला करीत शिविगाळ केली. या हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर शुक्रवार, 25 रोजी त्यांनी तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय कंखरे पुढील करीत आहेत. दरम्यान, आरोपी पसार झाला असून, त्याचा शोध सुरू करण्यात आला
---Advertisement---