---Advertisement---
तरूण भारत लाईव्ह । श्री हनुमान चरित्र कथा समितीतर्फे पांजरपोळ संस्थान येथे तीन दिवसीय श्री हनुमान चित्रकथाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समिती अध्यक्ष विश्वनाथ जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री हनुमान यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर श्री हनुमान यांच्या जीवन कथा चे निरूपण इंदूर येथील प्रसिद्ध कथा वाचक पं. पवनजी तिवारी हे त्यांच्या ओजस्वी वाणीने करणार आहेत. महाराष्ट्रात प्रथमच पं. पवनजी तिवारी श्री हनुमान चरित्र कथेचे निरूपण जळगाव येथे श्री पांजरपोळ संस्थान येथे ४ ये ६ एप्रिल रोजी दुपारी ३ ये ६ वाजेपर्यंत करणार आहेत. या कथेच्या आयोजनामागील भुमिका स्पष्ट करताना विश्वनाथ जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, श्री हनुमानजीची दिव्य, अलौकिक शक्तीचा समाजास परिचय करुन देणे. श्री हनुमान भगवान यांच्या जीवन चरित्रातून बोध घेऊन तरुण वर्गास प्रेरणा देणे. श्री हनुमानजी यांना प्रभू श्रीराम यांनी अयोध्येचा राजा का बनविले? त्यांचे लग्न कसे झाले? त्यांचा पुत्र कोण या आणि इतर विषयांबाबत पं. पवन जी तिवारी हे विस्तृत प्रबोधन करणार आहेत. तरी भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आोजकांतर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी सुरेश कोठारी, दीपक लढ्ढा, दिपक व्यास, सुरेंद्र अग्रवाल, विनोद बलदवा, गोपाल पंडित, चंद्रप्रकाश पंडित, शिवजी रामवत, दिनेश पुरोहित, मुरलीधर चांडक, अशोक जाजु आदी उपस्थित होते.