---Advertisement---

सुधा काबरा यांचा भाजपात प्रवेश; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार

by team
---Advertisement---

तरुणभारत लाईव्ह न्युज : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षसंघटन, कार्यकत्यार्ंंशी संवाद मार्गदर्शन तसेच विविध कामांनिमित्त जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडला.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा बॉक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनच्या सुधा काबरा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, भाजप महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, युवक भाजप युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी भैरवी पलांडे-वाघ, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, हर्षल पाटील, सुरेश धनके, डॉ.राधेश्याम चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्षांनी केले कौतुक

गेल्या सात वर्षांपासून बॉक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून सुधा काबरा यांनी 104 गरजू व निराधारांना रोजच्या जेवणाचे डबे पुरविले. तसेच संसर्ग प्रतिबंधात्मक काळात मास्क वाटप, जिल्ह्यातील विविध शाळातील विद्यार्थीनींमध्ये जनजागृती, सॅनिटरी नॅपकीन वाटप, जिल्ह्यातील 49 शाळांमधील 9 हजारावर विद्यार्थीनींची स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मदतीने शारिरीक व मानसिक आरोग्य तपासणी, शालेय साहित्य वाटप यासह विविध उपक्रम नियमित राबवत आहेत. या सामाजिक कार्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कौतुक करत सुधा काबरा यांना शुभेच्छा दिल्या. भाजपतील पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प सुधा काबरा यांनी यावेळी केला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment