---Advertisement---

पांजरपोळ संस्थानातील श्री हनुमान चरित्र कथेला मंगळवारपासून होणार प्रारंभ!

by team

---Advertisement---

जळगाव : शहरातील पांजरा पोळ संस्थानात श्री हनुमत चरित्र कथा समिती जळगावच्या वतीने  ४ ते ६ एप्रिल दरम्यान आयोजित तीन दिवसीय श्री हनुमंत चरित्र कथा कार्यक्रमाचा प्रारंभ दुपारी ३ वाजता होणार आहे.

श्री हनुमंताच्या संपूर्ण जीवन अवतार कार्याचे सखोल ज्ञानपूर्ण माहिती पंडित पुष्पा नंदन जी आपल्या सुमधुर वाणीतून देणार आहेत. या तीन दिवसीय हनुमान चरित्र कथेतून हनुमंताच्या जन्मोत्सव विवाह उत्सव व राज्याभिषेक उत्सव विषयी तसेच पुत्र प्राप्ति कहाणी विषयी चे रहस्य आपल्या निरूपणातून ते उलगडणार आहे. तरी या सुश्राव्य कथेचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

आयोजक समितीचे वतीने ही कथा चिरकाल स्मरणात राहण्या दृष्टीने तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला मंडळांनी देखील सक्रिय सहभाग घेवून पुढाकार घेतला आहे.यात जळगाव शहर तालुका माहेश्वरी महिला मंडळ, धर्म सेवा महिला मंडळ, संस्कार परिवार, सिखवाल ब्राह्मण समाज महिला मंडळ, यांचेसह पांझरापोल संस्थान, मा हेश्र्वरी समाज गौ- सेवा संघ, सत्संग भजन मंडळ आदींचा समावेश आहे. तसेच या कथेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण धर्म दर्शन चॅनल क्रमांक ३२ वर यु tube च्या माध्यम तून केले जाणार असल्याचे आयोजकांचा वतीने कळवण्यात आले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---