---Advertisement---
ऑइल रिफायनरीच्या ऑफिसमधून अडीच लाखांची रोकड लंपास
by team
Updated On: डिसेंबर 2, 2022 12:46 pm

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । पाचोरा शहरातील बाजोरिया ऑइल रिफायनरी च्या ऑफिस मधून अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखांची रोकड चोरून नेली. या घटने बाबत पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाचोरा शहरातील रहिवासी आशिष जगदीश बाजोरिया यांच्या मालकीची मोंढाळे रोड भागातील वसाहत मध्ये असलेल्या बाजोरिया ऑइल रिफायनरी मधील ऑफिसमध्ये आज पहाटे दीड ते साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून ऑफिसच्या दरवाजातून आत प्रवेश करून ऑफिस मधील कपाटातील व ड्रावर मधून दोन लाख 61 हजाराची रोकड चोरून पसार झाले.
सदरील प्रकार फिर्यादी आशिष जगदीश बाजोरिया हे बेंगलोर येथून आल्यावर रिफायनरीत गेले असता ऑफिसमध्ये चोरी झाली असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्यांनी तात्काळ पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदरील घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली व पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केल्याने पोलिसात कलम 380, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र वल्टे करीत आहेत.