---Advertisement---

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : हिंदू महासंघ उच्च न्यायालयात

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेली होती. मात्र, आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज असल्याचे पुरावे सापडले नसल्याने एनसीबीकडून त्याला क्लीन चिट देण्यात आली. आता आर्यन खान च्या क्रुझवरील अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.

हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, अ‍ॅड. सुबोध पाठक (पालघर) यांनी सोमवारी पुण्यात याविषयी माहिती दिली. सुबोध पाठक म्हणाले, आर्यन खानला घटनास्थळी मुंबई अमली पदार्थ विभागाने रंगेहात पकडले होते. आर्यननेही गुन्हा मान्य असल्याचे तपास अधिकार्‍यांनी सांगितले होते. त्याच आधारावर सत्र न्यायालयाने दोन वेळा त्याचा जामीन नाकारला होता. मात्र, तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन आर्यन आणि त्याच्या सहकार्‍यांना सबळ पुरावा नसल्याचे कारण देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत की नाही, ते कायद्याच्या चौकटीत टिकणार की नाही, ही बाब ठरविण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मात्र, आरोपींना निर्दोष मुक्त करून न्यायालयाच्या अधिकारावर पोलिसांनी अतिक‘मण केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याविरोधात हिंदू महासंघाने न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली असून, या संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफिल राहिल्या, त्यांनी कशाप्रकारे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन सर्व आरोपीना मदत केली, हे मुद्देही उपस्थित केले आहेत. याप्रकरणी 36 पानांची कागदपत्रे कोर्टात दाखल केली आहेत. त्यामुळे आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment