---Advertisement---
जळगाव : राज्यासह जिल्ह्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मुक्ताईनगरच्या एका गावात पुन्हा २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली.
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात 20 वर्षीय तरुणी आपल्या परीवारासह वास्तव्यास आहे. जून महिन्यात एकेदिवशी तरुणी घरी जात असताना, संशयित आरोपी फारुख सुलतान पठाण (23) याने जबरीने ओढून नेत मारहाण करत आई, वडील, भाऊंना जीवे ठार मारण्याची धमकी देत राहत्या घरी नेत तिच्यावर अत्याचार केला व त्याचा व्हिडिओ बनविला.
सुमारे 25 दिवसांनी पुन्हा पिडीत तरुणीवर पुन्हा एकदा फारुखने धमकी देत अत्याचार केला तसेच लग्नासाठी जबरदस्ती केली. पीडीत तरुणीने लग्नास नकार दिल्याने फारुखने मोबाईलमध्ये केलेले व्हिडीओ व्हायरल करण्यासह नातेवाईकांना दाखवण्याची धमकी दिली तसेच आई, वडील, भाऊ यांना मारण्याची धमकीही दिली.
त्यानंतर आरोपीच्या लहान भाऊने पीडीतेच्या चुलत लहान भावासह आतेभावाला मारहाण केली. पीडीतेने तक्रार दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.