मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजय राऊतांनी विधिमंडळाच्या संदर्भात केलेल्या विधानाची विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेण्यात आली असून हक्कभंग समितीने विधान परिषदेच्या सभापतींना पत्र दिले आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संजय राऊतांनी काय विधान केलं होतं?
राऊतांनी विधिमंडळाच्या संदर्भात केलेल्या विधानाची विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेण्यात आली असून हक्कभंग समितीने विधान परिषदेच्या सभापतींना पत्र दिले आहे. संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या संदर्भात केलेल्या विधानावरून सत्ताधारी भाजप शिवसेना युतीच्या आमदार आणि नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राऊतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखालील विधान परिषदेच्या हक्कभंग समितीने कारवाई करण्याचा संदर्भात कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात राज्यसभेच्या सभापतींकडून अहवाल मागवण्यात येणार असून राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पत्राचाळ प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा – आ. संजय शिरसाट
विविध कारणांमुळे कायदेशीर आणि राजकीय वादात अडकलेल्या संजय राऊतांच्या मागे आता आणखी नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. गोरेगावच्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. याबाबत आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून लवकरच आयोगाच्या स्थापनेच्या संदर्भात निर्णय होण्याचे संकेत आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहेत.