---Advertisement---

Jalgaon : ओळखीचा फायदा घेत महिलेवर अत्याचार, पोलिसात…

---Advertisement---

जळगाव : राज्यासह जिल्ह्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अशाच पारोळा तालुक्यात पुन्हा  एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय महिला ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. याच गावातील संशयित लखन जगन पवार याने रविवार, 25 जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पिडीत महिलेला ओळखीचा फायदा घेत दुचाकीवर बसवून जंगलात नेत पीडीतेचे तोंड दाबून तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत जबरीने अत्याचार केला. भेदरलेल्या पीडीतेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेत लखन पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---