---Advertisement---

राष्ट्रीय डॉक्टर्स दिन : १ जुलैलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १ जुलै २०२३ : आजही गावखेड्यात डॉक्टरला परमेश्वराचं रूप मानलं जातं. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यावर अनेकांना आपल्या डॉक्टरांमुळे आपल्याला पुनर्जन्म मिळाला अशी भावना असते, ते तसे बोलूनही दाखवितात. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. भारतामध्ये आज १ जुलै हा दिन डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.

१ जुलैलाच का साजरा केला जातो ‘डॉक्टर्स डे’?

१ जुलै हा भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ बिधान चंद्र रॉय यांचा जन्मदिवस, यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून १ जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. १९९१ साली भारत सरकारने या दिवशी डॉक्टर्स डे म्हणून साजरा करावा असा निर्णय घेत सुरुवात केली. ४ फेब्रुवारी १९६१ साली डॉ. बिधान चंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ बहाल करण्यात आला आहे.

डॉ. विधान चंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ मध्ये पटना येथे झाला. फिजिशियन डॉ. बिधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळे रॉय यांना पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट असेही म्हणतात.

डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे शिक्षण कलकत्त्यामध्ये झाले. एमआरसीपी आणि एफआरसीएसची डिग्री लंडनमधून घेतली आहे. १९११ पासून त्यांनी भारतामध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सुरूवात केली.

भारतातील सर्वच डॉक्टरांनी कोविड १९ अर्थात कोरोना विरुद्ध लढा देत भारतीयांचे प्राण वाचविण्यात मोठे यश मिळविले आहे.आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचविले आहे.कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट आली तरी देशभरातील डॉक्टर्स  अखंडितपणे रुग्णसेवा करीतच होते.कोरोना विरुद्धच्या लढया दरम्यान देशभरातील बऱ्याच डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहे. त्या सर्वांना शतशः नमन. लॉकडाऊन च्या सुरुवातीच्या काळातही आपण सर्वांनी, थाळी, टाळी वाजवून या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केलेले आहे. तेव्हा आजच्या या डॉक्टर्स डे निमित्त देशातील सर्व डॉक्टरांना अनंत शुभेच्छा.

डॉ.धर्मेंद्र पाटील,नेत्ररोग तज्ज्ञ, जळगाव

९४२३१८७४८६

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment