---Advertisement---

Jalgaon News : अजितदादा गटाला जळगावात मिळाले मोठे पाठबळ

---Advertisement---

जळगाव : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर ९ आमदारांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे, यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या. या घडामोडी नंतर राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. शरद पवार यांनी पुन्हा पक्ष बांधणीची घोषणा करत मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे अजितदादा गटाला लोकांचे मोठे पाठबळ मिळत असल्याचे समोर येत आहे.

जिल्हयातील सावदा, ता. रावेर येथे पवार गटाला मोठे पाठबळ मिळाले आहे. माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्यासह बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे पाठबळ पक्षाच्या पाठीशी असल्याचे अधोरेखीत झाले आहे. ना. अनिल भाईदास पाटील मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात दाखल झाले असून, आजपासून जिल्हा दौरा सुरू केला आहे. यात त्यांनी आज सवेर येथील नुकसानग्रस्त शेतकयांची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आणि त्यांच्या सहकान्यांनी ना. अनिल पाटील यांचे जोरदार स्वागत केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून रावेर येथे रवाना झाले.

त्यांनतर ना. अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राजेश वानखेडे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार मनीष जैन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, पक्षाचे माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भुसावळ येथील माजी नगरसेवक विजय मोतीराम चौधरी, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, त्यांच्या मातोश्री तथा माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे आदींसह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कुशल सुरेंद्र जावळे, युवक शहराध्यक्ष गौरव चंद्रकांत वानखेडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते, महिला, सामाजिक न्याय आदींसह विविध सेलचे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य आदींनी ना. अनिल पाटील यांच्या उपस्थितीत अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश घेतला. त्यांचे ना. अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या गटाचाच असून जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा आपल्याला रावेर तालुक्यातून आणि विशेष करून सावधातून पाठबळ मिळाले असून याच प्रकारचा झंझावात जिल्हात सुरू होणार असल्याचा आशावाद मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

तर सावदा येथील बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसची जवळपास संपूर्ण कार्यकारिणीच अजितदादा पवार यांच्या गटात सहभागी झाल्याचे प्रतिपादन माजी राजे वानखेडे यांनी केले आहे.  ना. अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पक्षाची स्थानिक पातळीवर प्रगतीशील वाटचाल राहणार असल्याची ग्वाही राजेगा वानखेडे यांनी याप्रसंगी बोलतांना दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---