---Advertisement---

फरहान अख्तरची मुलगी झाली पदवीधर

by team
---Advertisement---

मुंबई
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा भाग असतो. मुलाने किंवा मुलीने खुप शिकुन मोठं व्हावं हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असत.तसाच भावनिक क्षण फरहान अख्तरसाठी देखील आला आहे  अख्तरला यावेळी वडील म्हणून अभिमान वाटतो आहे कारण त्याची मोठी मुलगी शाक्य अख्तर यूकेच्या लँकेस्टर विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. या कार्यक्रमात फरहानचे वडील-पटकथा लेखक जावेद अख्तर आणि त्याची माजी पत्नी अधुना भाबानी देखील उपस्थित होते.रहानने आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या मुलीच्या पदवीदान समारंभाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

 त्यांनी लिहिले,

आमच्या पदवीधर शाक्यचे अभिनंदन..  कुटुंब म्हणून तिथे आल्याचा आणि तुमची कामगिरी साजरी करण्याचा अभिमान वाटतो.. जग तुमचे आहे.” त्याची बहीण झोया अख्तर आणि त्यांची धाकटी मुलगी अखिरा अख्तर यांना टॅग करत अभिनेत्याने लिहिले, “तुझी आठवण आली.” त्याचे वडील जावेद अख्तर, आई हनी इराणी, शबाना आझमी, त्याची पत्नी शिबानी अख्तर, त्याची माजी पत्नी अधुना, त्यांची मुलगी शाक्य आणि तिच्या मित्रांसोबत पोज देत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment