---Advertisement---

Jalgaon News : दमदार पाऊसाने खरिपाच्या 90% पेरण्या पूर्ण!

by team

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.   जिल्ह्यात 7 लाख 69 हजार 601 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीकाची पेरणी होती. त्यापैकी आज 21 जुर्लैपर्यंत जिल्ह्यात 6 लाख 98 हजार 317 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात 90 टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यात गतवर्षाच्या तुलनेत यंदा कपाशी पिकाचा पेरा घटला आहे. 5 लाख 1 हजार 568 हेक्टर क्षेत्रावर जिल्ह्यात कपाशीची लागवड झाली आहे. गत वर्षाच्या तुलनेत पावसास विलंब झाल्याने 40 हजार हेक्टर कपाशी लागवडीचे क्षेत्र घटले आहे. जिल्ह्यात बोदवड तालुक्यात 100  टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात बोदवड तालुक्यात सर्वाधिक 100 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे पाचोरा तालुक्यात 99 टक्के तर जामनेर तालुक्यात 97 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात कपाशीचा पेरा घटल्याने इतर पीकाचा पेरा वाढणार आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत खरीप ज्वारी 41 तर बाजरी 39 टक्के पेरणी झाली आहे. तसेच जिल्ह्यात 17 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्याचप्रमाणे तूर 63 व मूगाची जिल्ह्यात 45  टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात तूर 10 हजार 397 तर मुगाची 12 हजार 868 हेक्टरवर पेरणी झाली आहे. उडदाची 13 हजार 844 म्हणजे 52 टक्के क्षेत्रावर उडीद पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झाल्याने या आठवडाभरात पेरण्या पूर्ण होतील, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कपाशीचा लागवड सर्वाधिक केली जाते. कपाशी हे नगदी पीक असल्याने शेतकरी या पिकाला प्राधान्य देतात. जिल्ह्यात 5 लाख 41 हजार 568 हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड होत असते. यंदा मात्र 5 लाख 01 हजार 568 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे लागवड झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा कपाशीचे क्षेत्र 40 हजार  हेक्टरने घटले आहे. पाऊस उशिराने दाखल झाल्याने या क्षेत्रावर कपाशी लागवडीचे वेळ निघून गेली आहे. त्यामुळे कपाशीच्या लागवडीवर त्यांचा परिणाम झाला झाल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात 74 हजार 874 हेक्टवर मका पेरणी

जिल्ह्यात जून महिन्यात वरूणराजाने पाठ फिरवल्याने कपाशी पीकाचे क्षेत्र घटले आहे. पाऊस जून महिन्यात विलंबाने दाखल झाल्याने मका व इतर पीकाकडे शेतकरी वळू लागला आहे. जुलै महिन्यात पावसास सुरूवात झाल्याने मका, ज्वारी, बाजरीचा पेरा वाढला आहे. जिल्ह्यात दरवर्षी 98 हजार हेक्टर क्षेत्रावर मका पीकाची पेरणी होते. यंदा मात्र पावसाअभावी अद्यापर्यंत 74 हजार 878 हेक्टवर मका पिकाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात 1 हजार 281 हेक्टरवर जिल्ह्यात 18 टक्के उसाची लागवड झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्याच्या 20 दिवसाच्या काळात 133 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 6 जुलै व 20 जुलै रोजी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यातील 21 दिवसात 61 टक्के पाऊस झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---