---Advertisement---
मुंबई : मुंबई शहरालगतच्या भागातदेखील मेट्रोचा विस्तार व्हावा, याकरिता राज्य शासनाकडून हालचाली सुरु असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबईलगतच्या शहरात आता दळणवळणाच्या सुविधांचा विकास होणार असून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना नवी मुंबई, उरणला जाण्यासाठी आता मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
तसेच, राज्य शासनाकडून प्रस्तावित असलेला मेट्रोचा कॉरिडॉर जेएनपीटी ते नायगावपर्यंत होता, त्याचा विस्तार विरारपर्यंत होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील , आमदार शांताराम मोरे, आमदार रवींद्र फाटक ,माजी महापौर प्रवीण शेट्टी आणि नारायण मानकर उपस्थित होते. तसेच, या निर्णयामुळे वसई विरार मधील नागरिकांना दळणवळणाचे आणखी एक साधन उपलब्ध होणार आहे.