---Advertisement---

jalgaon News: मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

by team
---Advertisement---

मुक्ताईनगर:  ढाब्यावर दोन दिवसांपूर्वी रेकी केल्यानंतर दरोडेखोरांच्या टोळीने जामनेर तालुक्यातील नवी दाभाडी फाट्याजवळील एका ढाब्यावर बुधवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकला. दरोड्यातील रक्कम लुटून संशयित कारद्वारे पसार होत असताना ढाबेचालकांना जामनेर पोलिसांना सूचित करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली तर संशयित बोदवड-मुक्ताईनगरच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होताच मुक्ताईनगर पोलिसांनी नाकाबंदी लावून संशयितांना पाठलाग करून अटक केली. संशयितांकडील गावठी पिस्टल, चॉपर आणि एक गुप्ती जप्त करण्यात आली.

रेकी करीत टाकला दरोडा

जामनेर-बोदवड रोडवरील वाडी फाट्याजवळ रवींद्र बडगुजर (रा. नवी दाबाडी) यांचा एकाकी ढाबा आहे. या ढाब्यावर काही लोक बसले असताना काही अंतरावर कार लावून चार संशयित पायी चालत ढाब्यावर आले. त्यांच्यापाठोपाठ आणखी चार जण येऊन त्यापैकी एकाने व्यवस्थापक रवींद्र वाघ यांच्या डोक्याला पिस्टल लावून गल्ल्याची चावी मागितली. चावी न दिल्याने त्यास लाकडी दांड्याने मारहाण केली तर दुसऱ्या एकाच्या मानेवर सुरा ठेवून इतरांकडून  दीड लाखांचा ऐवज घेऊन दरोडेखोर बोदवडकडे पसार झाले.

याबाबत ढाबा मालक बडगुजर यांनी जामनेर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ बोदवड-मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली.

दरोड्याच्या साहित्यासह जाळ्यात

मुक्ताईनगर हद्दीत पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेरबंद केले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. संशयित मुकेश फकिरा गणेश (42, वखारी, जय भीमवाडी, शहापूर), शेख भुरा शेख बशीर (शहापूर), शेख शरीफ शेख सलीम (35, ईच्छापूर), शाहरुख शहा चांद शहा (20, आंगणनाका उज्जैन), अझरुद्दीन शेख अमीनुद्दीन (36, अमीनपुरा, बऱ्हाणपूर), अंकुश तुळशीराम चव्हाण (20, खापरखेडा, ता.खकनार), खजेंदरसिंग कुलबीरसिंग रीन (40 लोधीपूरा, बऱ्हाणपूर), शेख नय्यूम शेख कयूम (45, शहापूर) अशा आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 69 हजार 650 रुपयांच्या रोकडसह पिस्तूल, तीन जिवंत काडतूस, ईरटीगा, चॉपर आदी अन्य साहित्य जप्त करण्यात आले. संशयि  26 पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment