---Advertisement---
जळगाव : जीर्ण इमारत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजता शहरातील शिवाजी नगरात घडली. राजश्री सुरेश पाठक (६६) असे मयत महिलेचे नाव आहे. तब्बल साडेचार तास राबविलेल्या सर्च ऑपरेशनात प्रशासनाला महिलेचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.
जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात तीन मजली जुनी इमारत कोसळल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत एका कुटुंबातील तिघांना वाचविण्यात यश आले. तर एक ६६ वर्षीय महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याचं समोर आलं. या महिलेला वाचविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु केले.
राजश्री पाठक असे या महिलेचे नाव असून घटनास्थळी बचाव पथकाच्या माध्यमातून इमारतीचा ढिगारा बाजूला करण्यात आला. या ठिकाणी मनपा महापौर जयश्री महाजन, आयुक्त विद्या गायकवाड आणि जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. तब्बल साडेचार तास राबविलेल्या सर्च ऑपरेशनात प्रशासनाला महिलेचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला दुसरीकडे राहत होत्या. कधीतरी या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येत होत्या. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक तीन मजली इमारत कोसळली. त्यात या दोन्ही महिला ढिगाऱ्याखाली अडकल्या गेल्या. दरम्यान, लागलीच बचावकार्य सुरू केल्याने दोघांपैकी एका 52 वर्षीय महिलेला बाहेर काढण्यात यश आले.