---Advertisement---
जळगाव: शहरात अमृत योजनेचे 40 हजार घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी अमृत योजनेचा पाणीपुरवठा पोहोचलेला नाही. यात अद्याप 30 किलोमीटरचा पाईपलाईनचा टप्पा पूर्ण करणे बाकी आहे. त्यामुळे येत्या काळात या कामाला गती मिळणे अपेक्षित आहे. शहरातील ज्या भागांमध्ये अमृत योजनेच्या कनेक्शनसंदर्भात तक्रार येते, ती येत्या काळात बंद होणार आहे.शहरात सन 2018 पासून अमृत योजनेच्या कामाला प्रारंभ झाला.
मात्र अजूनही काही कामे पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या योजनेचे काम 95 टक्के पूर्ण झाले असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. हे काम विविध भागांमध्ये पूर्ण झाले आहे. त्यासाठी 863 किलो मीटरची वाढीव कनेक्शनसह पाईपलाईन पूर्ण झालेली आहे. यामुळे शहरातील घराघरांमध्ये या योजनेतून पाणी पोहोचणार आहे. अजूनही 30 किलोमीटरपर्यंत या योजनेचे काम बाकी आहे. यात शहरातील विविध भागांमध्ये 76 हजार 200 कनेक्शनची मागणी करण्यात आलेली होती. यातून 39 हजार 624 कनेक्शन सुरू करण्यात आले आहे. 16 हजार 764 कनेक्शनची चाचणी पूर्ण झाली आहे. शहरात अमृत योजनेतून 60 टक्केच पाणी मिळत आहे. यात 20 टक्के कामांची चाचणी सुरू आहे.पाणीपुरवठा योजनेत 6 पाण्याच्या टाक्या असून 5 टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. एकूण 586 किलोमीटरची पाईपलाईनचे काम आहे. पाच पाण्याच्या टाक्या बांधून झाल्या. एका टाकीच्या जलवाहिनीचे काम आगामी दोन महिन्यात पूर्ण होईल.