---Advertisement---
जळगाव: गटार सापकरणाऱ्या स्वछता कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्कयाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.मयत तरुणाचे नाव विशाल चिरावंडे नाव असून दोन वर्षांपासून नशिराबाद नगरपंचायतीमध्ये कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते.गावाजवळील दिलीप शांताराम कुळकर्णी यांचे शेत असून, त्यांचे शेत सोपान विठोबा वाणी यांनी नफ्याने करण्यासाठी घेतले आहे.वाणी यांनी शेताला तारांचे कुंपण केले असून,
त्यात वीजप्रवाह सोडण्यात आला आहे. याच कुंपणाला लागून मंगळवारी (ता. ५) सकाळी आठला विशाल चिरावंडे गटारीचे काम करीत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नफ्याने शेत करणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण केली व जखमी केले.ही घटना लक्ष्यात आल्यानंतर तरुणाला खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.तपासणी नंतर तरुणाला मृत घोषित करण्यात आले. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
शेतकऱ्यावर गुन्हा
शेत नफ्याने करत असलेल्या सोपान वाणी याने शेताच्या बांधाला लाकडी पोल ठोकून त्यांना तारांचे कुंपण करून त्यात वीजप्रवाह सोडला होता. विजेचा धक्का लागून इतरांचा जीव जाऊ शकतो याची जाणीव असताना वीजप्रवाह बंद न केल्यामुळे सफाई कामगार विशाल चिरावंडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार सोपान वाणी याच्याविरुद्ध (कलम ३०४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









