---Advertisement---

‘जश्न ए शादी’,लग्नाची पत्रिका आली!

by team

---Advertisement---

गेल्या काही महिन्यांनपासून बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या  चर्चांला  उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यानआधी परिणीती आणि राघव चढ्ढा यांनी साखरपुडा केला होता.

या कार्यक्रमाला बॉलीवूडच्या सेलिब्रेटींपेक्षा राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी जास्त गर्दी केली होती.त्यानंतर त्या परिणीती आणि राघव यांना नेटकऱ्यांनी लग्नाच्या तारखेवरुन प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते,आता सोशल मीडियावर वरती यांच्या लग्नाची पत्रिका नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे.त्यांनी लग्नाच्या  पत्रिकेतुन नेटकऱ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली आहेत.

परिणीती आणि राघव हे येत्या ३० सप्टेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. ते चंदीगडमधील ग्रँड ताज हॉटेलमध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. परिणीती आणि राघव चढ्ढा हे पंजाबी पद्धतीनं लग्न करणार आहेत. ते राजस्थानमध्ये २३ आणि २४ डिसेंबर रोजी पंजाबी रीतिरिवाजानुसार लग्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्री वेडिंग कार्यक्रम हे २३ डिसेंबर रोजी होणार आहे. २४ डिसेंबर रोजी ते राजस्थानमधील उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---