---Advertisement---
मुंबई : बाप्पाच्या अवघे काहीच दिवसच बाकी राहिले आहे. तसेच पुण्यात व संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाची तयारीही जोरात सुरू झाल्याची पाहिला मिळते आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचा देखावा पुणेकरांच्या आकर्षणाचं प्रमुख स्थान असतं.
यावर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंडळ यांच्याकडून अयोध्येतील श्रीराम मंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात येण्याची शक्यता आहे.
अशी माहिती समोर आली आहे कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.तसेच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी योगी आदित्यनाथ देखील पुण्यात येण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गणेशोत्सवासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.









