---Advertisement---

हलखेडा गावातील युवकाचा तलावात बुडून मृत्यू

by team
---Advertisement---

मुक्ताईनगर ः गणरायाला निरोप देण्यासाठी गेलेला तरुण पाझर तलावात बुडाल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे गुरुवारी घडली. हलखेडा गावातील गावातील एका पाझर तलावात गणेश विसर्जनासाठी आल्यानंतर फिरोज गव्हाणसिंग पवार (25, हलखेडा, ता.मुक्ताईनगर) हा तरुण बुडाला.

गुरुवारी रात्री घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत शोधूनही तरुणाचा शोध लागला नाही मात्र शुक्रवारी पुन्हा शोधमोहिम राबवण्यात आल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास तरुणाचा मृतदेह हाती लागला. हलखेडा येथील फिरोज गव्हाणसिंग पवार (25) हा युवक गुरुवारी सायंकाळी आपल्या घरातील श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी सिनफाटा येथील पाझर तलावात गेला होता मात्र यावेळी त्याचा पाण्यात तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला. यावेळी उपस्थितांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील अनेश बनेशबाबु पवार यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पोहणाऱ्यांच्या मदतीने तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र शोध लागला नाही तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी चांगदेव येथील नावाडी संघटनेच्या पोहणाऱ्यांनी मोहिम सुरू केल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास फिरोजचा मृतदेह आढळला. याबाबत पोलीस पाटील अनेश पवार यांच्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment