---Advertisement---

jalgaon news: जिल्हा परिषदेच्या 4 हजार कर्मचाऱ्यांचे पेन्शन ऑनलाईन जमा

by team

---Advertisement---

जळगाव :  येथील जिल्हा परिषदेने ऑनलाईन कामकाजाच्या बाबतीत भरारी घेतली आहे. अर्थ विभागातून प्रथमच ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हाभरातील सेवानिवृत्त 4 हजार 10 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यावर झेड.पी.एफ.एम.एस. प्रणालीद्वारे निवृत्तीवेतन (पेन्शन) गुरुवारी 28 रोजी जमा करण्यात आले आहे.

सेवानिवृत्त वेतन हे सेवानिवृत्त कर्मचा-यांना वेळेवर मिळावे, यासाठी जिल्हा परिषद नेहमी प्रयत्नशील राहिली आहे. पेन्शनर यांना दरमहाची पेन्शन 1 तारखेला मिळण्याबाबत शासनाचे आदेश असल्याने व निवृत्ती विषयक कामात अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी जिल्हा परिषदेचे कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने  व्हावे, यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यानी लक्षकेंद्रीत केले आहे.  यासाठी शासनाकडून विहीत कालावधीत अनुदान उपलब्ध करणे, कोषागारातून रक्कम आहरीत करणे व कर्मचारी यांच्या खाती निवृत्तीवेतन रक्कम जमा करण्यासाठी जि.प. अर्थ विभागाने कात टाकून संगणक – ऑनलाईन प्रणालीचा वापर सुरू केला आहे. अर्थ विभागातून ही रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

प्रथमच याप्रकारे निवृत्ती वेतनाचे वितरण करण्यात आले असून या कामासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप वानखेडे, लेखाधिकारी अशोक तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पेन्शन शाखेचे वरिष्ठ सहाय्यक गुलाबराव पाटील, कनिष्ठ सहाय्यक सचिन पाटील व झेड.पी.एफ.एम.एस. प्रणालीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे. यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खौरनार यांनी सहकार्य केले.

मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी 

जिल्हाभरातील 15 तालुक्यांमधील शिक्षकेतर अशा 4 हजार 10 कर्मचा-यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या सूचनेनुसार मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील यांनी अंमलबजावणी या महिन्यापासून सुरू केली आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---