---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : भरधाव वेगातील बोरेलो चालकाने दुचाकीला धडक देत चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. या अपघातामध्ये दुचाकी चालकासह त्याची पत्नी व मुलगा जखमी झाले. शनिवारी 30 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना एमआयडीसीतील काशिनाथ चौकातील त्रिमुर्ती हॉटेलजवळ घडली. दुचाकीवरील दाम्पत्य व मुले रस्त्यावर पडल्याचे पाहिल्यानंतर चालक भरधाव वेगात बोलेरोसह घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
अशोक कुमार अनिलसिंग (32) हे अयोध्यानगर येथे कुटुंबासह वास्तव्यास असून ते व्यावसायिक आहेत. ते शनिवारी रात्री त्यांच्या मालकीची दुचाकी एमएच 19 बीएन 6934 ने पत्नी व मुलासह गावात जात होते. काशिनाथ चौकात आले असता भरधाव वेगातील बोलेरो चालकाने दुचाकीला धडक दिली. यात अशोककुमार त्यांच्या पत्नी व मुलगा दुचाकीवरुन खाली पडून जखमी झाले. त्यानंतर बोलेरो चालक वाहनासह पसार झाला. याप्रकरणी तक्रारीवरुन वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेकॉ संजय धनगर करत आहे.
सीसीटीव्ही फुटेजची घेणार मदत
अपघाताला निमत्रंण देत निरपराध तिघांना दुखापतीला कारणीभूत बोलेरो चालक याचा शोध घेण्याकामी या चौकात असलेल्या कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेजचा शोध पोलीस घेत आहेत. फुटेजच्या सहाय्याने संशयिताचा शोध घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.