---Advertisement---

jalgaon crime: नशेसाठी पैसे नाकारणाऱ्या बापावर सुरीने वार

by team

---Advertisement---

जळगाव : नशा करण्यास पैसे नाकारल्याचा राग मनात धरुन मुलाने जन्मदात्या बापावर सुरीने वार करुन जखमी केल्याची घटना गुरुवार 12 रोजी 11 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजीमहाराज नगरात गेंदालाल मिल परिसरात घडली. या हल्ल्यात  संतोष वामन लिंगायत (50) हे जखमी झाले.संतोष लिंगायत हे चालक आहेत. ड्रायव्हींग करुन ते कुंटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते गेंदालाल मिल बिल्डींग नं.34 रुम नं.40 याठिकाणी वास्तव्यास आहे.त्यांचा मुलगा महेश लिंगायत (23) हादेखील कुंटुंबात राहतो. महेश याने वडिल संतोष लिंगायत यांच्याकडे नशा करण्यासाठी 100 रुपयांची मागणी केली. परंतु नशा करण्यास त्यांनी पैसे दिले नाहीत.

हा राग मनात धरुन महेश याने गुरुवारी दुपारी हातातील सुरीने संतोष लिंगायत यांच्या छातीवर वार करत जखमी केले.त्यांना तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात नेले. पोनि अनिल भवारी यांनी घटनास्थळी जावून प्रकाराची माहिती घेतली.  याप्रकरणी संतोष लिंगायत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा महेश याच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोह राजकुमार चव्हाण तपास करत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---