---Advertisement---

jalgaon news: एकाच ठिकाणी ठाण मांडणाऱ्या अभियंत्यांना आयुक्तांचा दणका

by team

---Advertisement---

जळगाव : महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात गतीमानता येण्यासाठी विविध विभागातील अभियंत्यांवर महापालिकेच्या प्रशासकांनी नव्या कामाची जबाबदारी टाकली आहे. त्याबाबतचे आदेशही त्यांनी काढले आहेत.  मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता मनोज वन्नेरे यांच्याकडे नगररचना विभागातील पिंप्राळा व निमखेडी शिवार, विजय मराठे यांना नगररचना विभागातील मेहरुणची, आर.टी.पाटील यांना नगररचना (जळगाव शिवार), योगेश वाणी यांना नगररचना विभागातील टिपीएस 2 व खेडी (सा.बा.विभाग प्र.क्र. 7 व 8 सांभाळून),  नगररचना विभागातील आरेखक अतूल पाटील यांना नगररचना डीपी युनिट व टीपीएस, पाणी पुरवठा विभागातील जयंत शिरसाठ यांना नगररचना विभागात शासकीय पत्रव्यवहार, न्यायालयीन प्रकरणे व पाणी पुरवठा विभागातील प्र.क्र. 3, 4, 5, 6, व 17 कार्यभार सांभाळून, नगररचना विभागातील समिर बोरोले यांना सार्वजनिक बांधकाम विभागात,  सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता मनिष अमृतकर यांना बांधकाम विभागातील प्र.क्र. 3, 4, व 5, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रकाश पाटील यांना बांधकाम विभागातील प्र.क्र. 15,18 व 19 व पर्यावरण, नगररचनेतील  कनिष्ठ अभियंता प्रसाद पुराणीक यांना बांधकाम विभागात प्र.क्र. 12,13,14, बांधकाम विभागातील शाखा अभियंता नरेंद्र जावळे यांना बांधकाम विभागातील प्र.क्र.9,10 व 11, पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता जितेंद्र रंधे यांना पाणी पुरवठा विभागातील प्र.क्र.1,2 व 3 सांभाळून बांधकाम विभागातील प्र.क्र. 1 व 2 ची जबाबदारी दिली आहे. प्रशासकांनी बदल्याचे आदेश काढल्यानंतर चार दिवसांनी अखेर बदल्याचे आदेश सबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहचले.

राजकीय दबाव झुगारत आदेश पारीत

प्रशासक तथा आयुक्तांनी या बदल्यांचे आदेश काढले. परंतु त्या रद्द करण्याचे किंवा त्यात बदल करण्याबाबत काही अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव टाकत असल्याची चर्चा मनपात होत होती. मात्र यबाबत प्रशासकांनी हात वर करत कोणताही दबाब नसल्याचे स्पष्ट केले.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---