---Advertisement---
---Advertisement---
पाचोरा : शहरातील शांती नगर भागातील रहिवासी शांताराम पाटील (उपशिक्षक तावरे विद्यालय, पाचोरा) यांची मुलगी चेतना शांताराम पाटील (22) हिस डेंग्यू सदृश आजाराची लागण झाल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शहरातील खाजगी रुग्णालयात तीन दिवस उपचारादरम्यान परिस्थिती डॉक्टरांच्या हाताबाहेर गेल्याने जळगाव येथील खाजगी दवाखान्यात तत्काळ हलविण्यात आले. मात्र 14 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान तिची प्राणजोत मालवली. 15 रोजी सकाळी 11 वा. त्यांच्या मूळ गावी चिंचखेडे खुर्द या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. डेंग्यू हा आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना करून पाचोरा शहरास डेंग्यूमुक्त करणे गरजेचे झाले आहे. यावर्षी पाऊस कमी झाला असून पाचोरा शहरात सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे. पाचोरा नगरपरिषदेने तत्काळ दखल घेऊन फवारणीच्या प्रमाणात वाढ करावी व शहर डेंग्यू मुक्त करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.