---Advertisement---

जळगावकरानो सावधान! या आजाराने घेतला तरुणीचा बळी

by team

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : डेंग्यूने जिल्ह्यात पाय पसरविण्यास सुरुवात केली असून बाधित उपचार घेत असलेल्या 22 वर्षीय तरुणीचा शनिवार, 14 रोजी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.गेल्या पंधरा दिवसात तब्बल 46 जण डेंग्यूने ग्रस्त झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेतना शांताराम पाटील (22) या तरुणीला सुरुवातीला ताप आला. त्यानंतर तिचा पाचोरा येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र प्रकृतीत सुधारणा दिसून न आल्याने अधिकच्या उपचारासाठी तिला जळगाव येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती अधिक खालावून उपचारात शनिवार, 14 रोजी रात्री तिचा मृत्यू झाला.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्हयात डेंग्यूने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. रूग्णसंख्या वाढत असल्याने सतर्कता घेणे व ताप आल्यास तत्काळ उपचार घेणे याकडे लक्ष देणे रुग्णांसाठी महत्वपूर्ण ठरेल. बारा वर्षाखालील मुलांना डेंग्यूची बाधा सर्वाधिक होत असल्याचे वास्तव समोर आल्याने पालकांनी अधिक खबरदारी घेणे

डांसापासून डेंग्यूची उत्पत्ती

डासांमुळे आजाराला निमंत्रण मिळते. यासाठी सकाळी तसेच सायंकाळी डासांच्या उपद्रवापासून सुरक्षित राहण्याची नेहमी काळजी घ्यायला हवी. सर्व शरीर झाकले जाईल, असे कपडे परिधान करणे, मच्छरदाणीचा झोपताना वापर करणे, याबरोबरच साठवण केलेल्या पाण्याचीदेखील काळजी घेणे आवश्यक आहेत. शाळेत जाणाऱ्या बालकांना संपूर्ण अंग झाकले जाईल, असा ड्रेस घालावा. आजार होऊच नये, यासाठी काळजी घेण्ो केव्हाही चांगले असते.

15 दिवसात डेंग्यूचे 

असे आहेत रुग्ण

1 महिना ते 12 वर्ष

वयोगट बालक 27

पुरूष रुग्ण संख्या 07

महिला रुग्ण संख्या 12

या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

घाबरू नका; भरपूर पाणी प्या!

कुटुंबात कोणाला ताप आला असे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरकडे नेवून तपासणी करुन उपचार घ्यावा. भरपूर पाणी प्यावे. उपवास करु नये. लघवी लालसर किंवा शौचातून रक्त जाणे, ब्रश करताना तोंडातून किंवा नाकातून रक्त आल्यास तत्काळ डॉक्टरकडे रुग्णास न्यावे. डासांपासून बचाव करण्यासाठी नियमित काळजी घ्यावी. पांढऱ्या पेशा कमी झाल्याने घाबरुन जावू नये. काळजी व उपचार घ्यावेत. उपचारातून रुग्ण बरा होत असतो.

-डॉ.विजय गायकवाड 

वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, 

डांसापासून डेंग्यूची उत्पत्ती

 

डासांमुळे आजाराला निमंत्रण मिळते. यासाठी सकाळी तसेच सायंकाळी डासांच्या उपद्रवापासून सुरक्षित राहण्याची नेहमी काळजी घ्यायला हवी. सर्व शरीर झाकले जाईल, असे कपडे परिधान करणे, मच्छरदाणीचा झोपताना वापर करणे, याबरोबरच साठवण केलेल्या पाण्याचीदेखील काळजी घेणे आवश्यक आहेत. शाळेत जाणाऱ्या बालकांना संपूर्ण अंग झाकले जाईल, असा ड्रेस घालावा. आजार होऊच नये, यासाठी काळजी घेण्ो केव्हाही चांगले असते.

 

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---