---Advertisement---
जळगाव : नवरात्रोत्सवात देवी बसविण्याच्या कार्यक्रमात भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. रविवार, 15 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास कुसुंबा येथे बेलदारवाडीत ही घटना घडली. ईश्वर निवृत्ती लोहार (24) रा. कुसुंबा असे जखमीचे नाव असून संशयित नीलेश कोळी (कुसुंबा) याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुसुंबा गावातील बेलदारवाडी येथे ओम साई राम मित्र मंडळाच्या देवी बसविण्याचा कार्यक्रम रविवारी सुरू होता. दरम्यान गावातील नीलेश कोळी तसेच क्रिष्णा भालेराव यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद होवून भांडण सुरू झाले. हे भांडण सोडविण्यासाठी ईश्वर लोहार यांनी याठिकाणी धाव घेतली. ते दोघांना समजूत घालत असताना निलेश कोळी याने त्यांना शिवीगाळ करत हातातील धारदार शस्त्राने पोटावर वार केले.या घटनेत ईश्वर लोहार हे गंभीररित्या जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या तरुणांनी त्यांना तत्काळ उपचारार्थ हलविले. घटना कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत,पोनि जयपाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी जखमी ईश्वर लोहार यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात निलेश कोळी याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पोउपनि अनिस शेख करत आहेत.