---Advertisement---

जामनेर तालुक्यातील वाकडी येथील आरोग्य केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

by team

---Advertisement---

प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथे 18 रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित यांनी भेट दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी केली. प्रसुती गृह, ऑपरेशन थेटर, औषधी साठवण कक्ष, लस साठा याची  तपासणी करण्यात आली. प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथे सुरू असलेल्या आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड कॅम्पला जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याची प्रकिया पूर्ण केली.  या कॅम्पात शंभर कार्ड काढण्यात आले. जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी कामकाज सुधारण्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत भोसले, सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण आदी उपस्थित होते.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.सागर पाटील यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले.

यावेळी औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील, आरोग्य सहाय्यक गोपाळ पाटील, व्ही.एच.माळी, रवींद्र सूर्यवंशी आरोग्य सहाय्यीका सुरेखा गोसावी, शोभा घाटे, आरोग्यसेवक सुनील बोरसे, स्वप्नील महाजन, हेमंत पाटील, अनंत गंगतिरे, विनोद पाटील, धीरज पाटील, अनिल सोनवणे, आरोग्यसेविका मनीषा पवार, गटप्रवर्तक ज्योती पाटील, मीनाक्षी बिंदवाल, पुजाबाई रबरे, रोहित गोयर, चरण चव्हाण, जावेद तडवी, सांडु गोंधळी, अंगणवाडी सेविका संघमित्रा इंगळे, ज्योती औटी, लता राजपूत, इंदूबाई वाणी, छाया सुरवाडे, राधा राजपूत, शकुंतला औटी आदी उपस्थित होते.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---