---Advertisement---

भुसावळमार्गे तब्ब्ल एक महिना धावणार ‘या’ उत्सव विशेष गाड्या

by team
---Advertisement---

भुसावळ कडून नागपूर, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.मध्य रेल्वेने दिवाळीसाठी काही गाड्या चालवण्याचा विशेष निर्णय घेतला आहे.लोकमान्य टीळक टर्मिनन्स ते नागपूर या स्थानकांदरम्यान आज २६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत द्विसाप्ताहिक सुपरफास्ट गाडी चालविण्यात येणार आहे.अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी एकूण २२ फेऱ्या होणार असून, ही गाडी अकोला स्थानकावर थांबणार आहे. ०१०३३ एलटीटी-नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट २६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसपासून दर मंगळवार आणि गुरुवारी २०:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०:२५ वाजता नागपूरला पोहोचेल.

०१०३४ नागपूर-एलटीटी द्विसाप्ताहिक सुपरफास्ट २७ ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत दर बुधवार आणि शुक्रवारी १३:३० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. पूर्णपणे वातानुकुलीत असलेल्या या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा स्थानकांवर थांबा असणार आहे. एक फर्स्ट एसी, दोन एसी-२ टियर, १५ एसी-३ टियर, पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन, अशी या गाडीची संरचना आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment