---Advertisement---

शेजारी रात्रीच्या वेळी घरात घुसला, जीवे मारण्याची धमकी देत… जळगाव जिल्हा हादरला

---Advertisement---

जळगाव : मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत, २९ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीसात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय महिला आपल्या दोन मुली व परिवारासह वास्तव्यास आहे. पीडित महिलेने दिलेल्या फियादीनुसार, गावात राहणारा विक्की पाटील (२५) हा दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता फियादीच्या घरात घुसला. दरम्यान, फिर्यादीच्या मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत पीडितेवर  अत्याचार केला.

या प्रकरणी पीडित महिलेने बुधवार, १ नोव्हेंबर रोजी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी विक्की पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---