---Advertisement---

मराठी अप्सरेचे दक्षिणेत पदार्पण

by team
---Advertisement---

मुंबई : मराठी कलाविश्वातील प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, श्रुती मराठे, सचिन खेडेकर अशा अनेक कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यादीत आता लवकरच मराठी मनोरंजन विशतील लोकप्रिय अभिनेत्रीचे नाव जोडले जाणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून, महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आहे.

सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम् चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहनलालसह स्क्रीन शेअर करणार आहे. ‘मलाईकोट्टई वालीबान’ असे या चित्रपटाचे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनालीच्या दाक्षिणात्य पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर तिने या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment