---Advertisement---

jalgaon news: तरुणाचा मारहाणीत संशयास्पद मृत्यू

by team
---Advertisement---

जळगाव : रात्री उशिरा घरी आलेला तरुण गुरुवार 14 रोजी सकाळी बेशुध्दावस्थेत व दुखापत स्थितीत आढळला.त्यामुळे तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. पवन सुधाकर दुसाने (37) रा. नित्यानंदनगर असे मृताचे नाव आहे.बुधवारी रात्री उशिरा पवन घरी आला. सकाळी तो बेशुध्दावस्थेत आढळला. आई सुनंदाबाई यांनी नातेवाईकांनी ही माहिती दिली.पवन यांच्या डोक्याला तसेच पाठीला गंभीर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, असा संशय मयताचे चुलतबंधू डिंगबर दुसाने यांनी व्यक्त केला. गुरूवार 15 रोजी दुपारी मयताचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी दोन मुली, आई वडील तसेच भाऊ असा परिवार आहे. रामानंदनगर पोलिसांनी पंचनामा केला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment