---Advertisement---

केंद्र सरकारने बदलला निर्णय, साखर कारखानदारांना इथेनॉल उत्पादनास परवानगी

by team
---Advertisement---

नवी दिल्ली,ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. उसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे १७ लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे. हा निर्णय साखर कारखानदारांना दिलासा देणारा ठरला आहे.परिणाम दरांवर होत असल्याने सध्या देशात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात होते.

मात्र, वाढता विरोध पाहता सरकारने पुन्हा इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे.निर्णयाचे स्वागत केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी स्वागत केले आहे. इथॉनॉलच्या निर्मितीवर बंदी घालणे हा चुकीचा निर्णय होता. जगभरातील देशांनी एकत्र येऊन पर्यायी इंधन वापरण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.अब्जावधी रुपयांची गुतवणूक खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांना प्रोत्साहन, सबसिडी आणि व्याजात सवलत देऊन इथेनॉलचे प्रकल्प उभे करण्यास सांगितले आहे. साखर उद्योगाला चालना मिळावी, यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे भाग भांडवल देशातील साखर उद्योगाने यात गुंतवले आहेत. अशातच अचानक केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातली होती. याचा मोठा फटका कारखानदारांना बसणार होता.उसाच्या उत्पादनात घट झाल्याचा

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment