---Advertisement---

Jalgaon News: पाण्यात बुडून कामगाराचा मृत्यू, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

by team

---Advertisement---

जळगाव : काम करताना पाण्यात बुडाल्याने कामगाराचा मृत्यू ओढवला. ही घटना जळगाव एमआयडीसी परिसरातील मीनाक्षी कंपनीत सोमवारी सकाळी 7 वा. उघडकीस आली. एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश वसंत सोनार (29, साई नगर, जळगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे. गणेश सोनार हा आई, वडील, दोन भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. साधारण एक वर्षांपासून तो जळगाव एमआयडिसीतील ए- सेक्टरमधील मीनाक्षी या कंपनीत कामाला लागला होता.

18 रोजी सकाळी 7 वा. कंपनीत असताना त्याला अचानक फिट आले व तो पाण्यात पडला, अशी माहिती कामगारांनी दिली. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी कंपनीतल्या कामगारांनी आणले असता, त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषित केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---