---Advertisement---

प्रतिभा शिंदे काँग्रेसमध्ये दाखल; राहुल गांधींनी केले स्वागत

---Advertisement---

Pratibha Shinde : लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी बुधवार, २० रोजी खासदार राहूल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला यातून पूर्णविराम मिळालेला आहे.

जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तथा लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत सुरू असलेल्या चर्चेला यातून पूर्णविराम मिळालेला आहे.

दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात खासदार राहुल गांधी व काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. त्यांना प्रदेश पातळीवरील महत्वाचे पद देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment