---Advertisement---
---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह ।७ जानेवारी २०२३। फास्टफूड प्रत्येकाच्या आवडीचं आहे चायनीज, पाणीपुरी, वडापाव, समोसे हे सगळ्यांनाच आवडत. काही लोक घरीच बनवून हे पदार्थ एन्जॉय करत असतात. फ्रँकी ही बाजारात ५० ते ६० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. फ्रँकी हा पदार्थ व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारामध्ये बाजारात उपलब्ध असतो. तुम्हाला माहित आहे का? व्हेज फ्रँकी हा पदार्थ घरी बनवायला सुद्धा अतिशय सोप्पा आणि टेस्टी आहे. व्हेज फ्रँकी कशी बनवायची व त्यासाठी काय साहित्य लागतात हे आपण आज बघणार आहोत.
साहित्य: उकडलेले बटाटे, कोबी, गाजर, तेल, सिमला मिरची, आलं लसून पेस्ट, हिरव्या मिरच्या, मैदा. शेजवान सॉस, टॅमोटो सॉस.
कृती: सर्वप्रथम एका भांड्यात तेल गरम करून तेलामध्ये कोबी, सिमला मिरचीचे काप, गाजराचे काप, हे चांगले परतून घ्यावे. त्यांनतर मैद्याची कणिक घट्ट भिजवून घ्यावी. भाज्या परतून झाल्यांनतर त्यामध्ये तिखट मीठ शेजवान सॉस , टॅमोटो सॉस प्रत्येकी १ चमचा घालावे.नंतर भिवलेल्या कणिकेची पोळी लाटून ती मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावी. पोळीवर भाज्यांचे मिश्रण घालून पोळीचा रोल करावा आणि गरम गरम फ्रँकी हि टॅमोटो सॉस बरोबर सर्व्ह करा