---Advertisement---

व्यावसायिक तरुणाने आयुष्य संपवले

by team
---Advertisement---

कासोदा : येथील राम नगरमधील रहिवासी मुकेश चौधरी (३५) या व्यावसायिकाने ८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी त्यांच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. याबाबत कासोदा पोलिसांत नोंद करण्यात आली.

कासोदा ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस त्यांच्या खाट व्यवसाय असलेल्या दुकानात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायते यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक श्रीराम पाटील, प्रवीण हटकर, समाधान तोंडे हे करीत आहेत. शवविच्छेदन एरंडोल ग्रामीण रुग्णालयात करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकुल वातावरणात मुकेश चौधरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुकेश चौधरी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment