---Advertisement---

चांदसैली घाटात चारचाकी वाहनाला अचानक आग; जिवीतहानी टळली

by team
---Advertisement---

तळोदा : चांदसैली गावाच्या काही अंतरावरील  मंदिरासमोर चालत्या डस्टर चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याने गाडीने मोठा पेट घेतला. तळोदा येथुन सकाळच्या वेळी निघालेली डस्टर कार चांदसैली मधील खडतर घाट पास करीत चांदसैली गावाजवळ जात असताना इंजिन गरम झाल्याने शॉर्टसर्किट होऊन कारने अचानक मोठा पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. यामुळे कार काही काळ जळतच राहिल्याने आता फक्त तिचा सांगाडा उरलेला असल्याचे चित्र आहे.

परंतु चालकाने प्रसंगावधान दाखवत चालक व अन्य गाडीमधून बाहेर पडल्याने जिवितहानी टळली. ही कार तळोदा येथून धडगावकडे जात असल्याचे प्रत्यक्षदर्शी सुकलाल पावरा, रा. रोझवा यांनी सांगितले. ही घटना 3 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. गाडीला अचानक आग लागल्याचे पाहून परिसरातील लोकांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे स्वरूप इतके प्रचंड होते की, त्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले होते. त्यामुळे लाखोंची गाडी डोळ्यादेखत जळाली व होत्याचे नव्हते झाले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment