---Advertisement---
Jalgaon Municipality : बंदी असलेला तथा जीवघेणा नायलॉन मांजा nylon manja विक्री करणाऱ्या ९ जणांवर महानगरपालिकेने बुधवारी कारवाई केली.
जोशी पेठेतील पतंग गल्लीत ही कारवाई झाली आहे. मंगळवारी देखील आठ दुकानांची तपासणी झाली होती. ख्वॉजामिया चौकात एका जणाकडून एक किलो मांजा जप्त करुन त्याला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला होता.
सहायक आयुक्त उदय पाटील यांच्या पथकाने बुधवारी परेश पंतगवाला, संदिप पंतगवाला, एस के फॅशन आदींकडून एकुण ५४ रिल नग नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.
मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, नागेश्वर लोखंडे, रमेश कांबळे तसेच आरोग्य निरीक्षक ललित बऱ्हाटे , सचिन ओढणे, विशाल वानखेडे , कुणाल बारसे, सुरज तांबोळी, चेतन हातागडे मुकादम राहुल पवार,राहुल निधाने यांनी ही कार्यवाही केली.
---Advertisement---