---Advertisement---
मुंबई : एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला असून त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. यानंतर आमदार अपात्रचा प्रकरणावरून विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर निशाणा साधला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय म्हणजे सत्याचा आणि लोकशाहीचा विजय आहे. अशी प्रतिक्रिया मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका बसला, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला आजचा निर्णय सगळ्यांचा आहे. सत्तेत आल्यापासून कायम एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार असे सारखे बोलत होते. परंतु अजूनही मी सत्तेत कायम आहे. हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका मिळाला आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विजय आहे. जो निर्णय झालेला आहे तो प्रत्येक ठिकाणी एक माइल स्टोन ठरणार आहे. हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप योग्य आहे.
आमदार अपात्रचा प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधक कोणालाच मानत नाही. निवडणूक आयोग, न्यायालयला देखील मानत नाहीत. ते सर्व संस्थांपेक्षा स्वतःला मोठे मानतात. नेहमी स्वतःला मोठे म्हणतात. सुप्रीम कोर्टाला देखील अनेक सल्ले देण्याचे त्यांनी काम केलं म्हणून त्यांना मोठी चपराक मिळाली आहे. 2019 मध्ये त्यांनी जनतेसोबत बेइमानी केली त्यांना हा मोठा चपराक आहे, असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.
---Advertisement---