पारोळा : प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारीला अयोध्येत भव्य मंदिराच्या गर्भगृहात होत आहे. या पार्श्वभूवर देशभरात विविध उपक्रमातून श्री राम भक्तीचा जागर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भवानी गड संस्थानचे अध्यक्ष डॉ.मंगेश तांबे यांच्याकडून मोफत ध्वज वितरित करण्यात येत आहे.
Jalgaon News : पारोळ्यात घरा-घरांवर डौलाने फडकणार श्रीराम ध्वज !
Published On: जानेवारी 12, 2024 8:12 pm

---Advertisement---
देशभरात विविध कार्यक्रम- उपक्रमातून प्रभू श्री राम भक्तीचा जागर करण्यात येत आहे. संपूर्ण देशात प्रभू श्री राम यांच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर उत्साह संचारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून घरांवर श्री राम ध्वज डौलाने फडकवा यासाठी ६ हजार ध्वजाचे वितरण तांबे यांच्याकडून मोफत करण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध प्रमुख चौकात भगवा पताका, २२ रोजी रात्री ८.३० वाजता महाआरती, महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन संस्थांनतर्फे मोहित तांबे यांच्याकडून करण्यात आले आहे.