---Advertisement---

धक्कादायक ! सोशल मीडियावर चाईल्ड पोर्नोग्राफीचे प्रसारण; आठ संशयितांविरोधात गुन्हा

by team
---Advertisement---

जळगाव :  युट्युब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवरून बंदी असलेल्या चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ प्रसारीत करणाऱ्या आरोपीविरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सोशल मीडियाच्या युट्युब आणि इंश्टाग्राम खात्यावरून १५ जानेवारी ते १० मे २०२१ दरम्यान खाते धारक हर्षल खोंडे, सोहिल एस.के, हुतेश महाजन, एस.वाय. बाविस्कर, ओएमजी टेक्निकल पॉईंट, आशिष छाब्रिया, सागर ललवाणी, आयुष चौधरी, आर्दीच्या युट्युब आणि इन्स्टाग्राम खात्यावरून हे व्हिडीओ प्रसारीत केल्याबद्दल.  पोलीस कॉन्स्टेबल दीपक सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार, १९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment