---Advertisement---

६० हजारांच्या रोकडवर डल्ला, दोघा नोकरांना ठोकल्या बेड्या

by team
---Advertisement---

मुक्ताईनगर :  वेल्डींग वर्कशॉपच्या दुकानात अलीकडेच कामाला लागलेल्या नोकरांनी मध्यरात्री दुकान फोडून त्यातील ६० हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार १८ जानेवारी रोजी रात्री घडला होता. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते व सहकाऱ्यांनी दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनुरुद्ध उर्फ लाला झल्लू शर्मा (२२, अशोक, ता. पहाडी, जि. चित्रकूट, उत्तरप्रदेश) व अरुण नामदेव धुंदले (६०, पिंप्रीभोजना, ता. मुक्ताईनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, अमित विलास राणे (३२, कोथळी, ता. मुक्ताईनगर) यांचे मुक्ताईनगर शहरात राणे फेब्रिकेशन वेल्डींग शॉप आहे. या शॉपवर अलीकडेच दोघा संशयितांना कामासाठी ठेवण्यात आले मात्र दुकानातील गल्ल्यात मोठ्या प्रमाणावर रोकड असत्याची कुणकुण दोघांना लागताच त्यांनी १८ रोजी रात्री ११ वाजेनंतर दुकानाचे शटर तोडून ड्रॉवरमधील ६० हजार रुपये लांबवले. हा प्रकार दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यानंतर सीसीटीव्हीत संशयित निष्पन्न होताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तपास हवालदार लिलाधर भोई करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment