---Advertisement---

पिस्तोल, जिवंत काडतुसे बाळगणारी टोळी गजाआड

by team
---Advertisement---

धुळे : पिस्तोलसह जिवंत कार्तुसे बाळगून असणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास ७ लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भोईटी कडून शिरपूरकडे येणाऱ्या चार चाकी वाहनात काही इसम आपल्यासोबत गावठी बनावटीचे पिस्तोल व जिवंत कर्तुसे आपल्यासोबत बाळगून आहेत. या मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी एक पथक तैनात करून रवाना केले. संशयित वाहन संबंधित पथकातील पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी वाहन चालकास वाहन थांबवण्यासाठी इशारा केला असता पोलिसांकडे दुर्लक्ष करत वाहन चालकाने भरधाव वेगाने शिरपूरच्या दिशेने पळविले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबविले असता तपासणी वाहनांमध्ये तीन गावठी बनावटीचे पिस्तोल व सहा जिवंत कर्तुसे आढळून आले आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जवळपास सात लाख 66 हजारांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment