---Advertisement---

चाळीसगाव हादरलं! ३५ वर्षीय तरुणाचा खून, कारण अद्याप अस्पष्ट

by team
---Advertisement---

चाळीसगाव : मकर संक्रांतीच्या दिवशीच चाळीसगावात ३५ वर्षीय तरुणाचा खून झाला. ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. दिनेश पवार (भावडू) (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील पवारवाडीत राहणाऱ्या दिनेश पवार (भावडू) (वय ३५) या तरूणाचा रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास खून झाला. पोतदार शाळेजवळ हा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ह्या खुनाचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस याची कसून चौकशी सुरू केली आहे. तत्पूर्वी एकीकडे मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत असताना ह्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment