---Advertisement---
BSE : या आठवड्यातील पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत निराशाजनक होते. आजचे सत्र मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांसाठी काळा सोमवार ठरला आहे. आजच्या व्यवहारात बँकिंग समभागांमध्येही जोरदार विक्री दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी BSE सेन्सेक्स 523 अंकांनी घसरून 71,072 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 166 अंकांच्या घसरणीसह 21,616 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारातील या घसरणीमुळे बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी घसरण झाली आहे. आजच्या व्यवहाराच्या शेवटी, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 378.85 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 386.43 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यापारात बाजाराचे मूल्य 7.58 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे