---Advertisement---

बारामतीतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित ?

by team
---Advertisement---

बारामती: लोकसभा निवडणूकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याचे संकेत आधीपासूनच मिळत होते. अश्यातच,शुक्रवारी सकाळपासूनच बारामतीमध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं कॅम्पेनिंग होताना दिसत आहे. काही वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे पाहिले जाईल हे आता निश्चित आहे. बारामतीत झालेल्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी मीच उमेदवार आहे असे समजून प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन केले होते. त्याच वेळेस सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

त्याच दृष्टीने सुनेत्रा पवार यांनी देखील गेल्या काही दिवसांपासून दौऱ्यांना सुरुवात केली आहे. त्या विविध गावांना भेटी देत आहे. कालच त्यांनी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली होती. त्यामुळे त्याची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment