---Advertisement---

मोदींच्या गॅरंटीवर मोदींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास- जे.पी. नड्डा

by team

---Advertisement---

नवी दिल्ली : प्रगती मैदानस्थित भारतमंडपम्मध्ये भाजपाच्या द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा शुभारंभ झाला, त्यावेळी आपल्या उ‌द्घाटनपर भाषणात जे.पी. नड्डा बोलत असतांना.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दांवर (गॅरंटी) देशातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक जिंकून मोदी लोकसभा निवडणुकीतील विजयाची हॅट्ट्रिक करतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये लवकरच भाजपाचे सरकार आलेले तुम्हाला दिसेल, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकारी, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. भाजपाचा ध्वज नड्डा यांच्या हस्ते फडकविण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपाला अच्छे दिन आले आहेत.

त्यामुळे भाजपा ३७० जागा जिंकेल तसेच रालोआसह आम्ही चारशेपेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला. भारतीय जनसंघ ते भाजपा अशा सात दशकाच्या प्रवासात आम्ही सर्व प्रकारचा काळ पाहिला, संघर्षाचा काळ पाहिला तसेच उपेक्षेच्या काळाचाही अनुभव घेतला, असे स्पष्ट करत नड्डा म्हणाले की, जमानत
वाचविण्यासाठी निवडणूक लढवण्याचा काळही पाहिला. निवडणुकीतील जय पराजयचाही अनुभव घेतला. आणिबाणीचाही काळ पाहिला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील गेल्या दहा वर्षांचा कार्यकाळ आमच्यासाठी सर्वांत आनंदाचा, अभिमानाचा तसेच मोठ्या उपलब्धीचा काळ होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---